मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिट अँड रन कायद्या विरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी शिष्टाई कामी आली असून त्यांच्या बैठकित कंपनी प्रशासन, महसूल अधिकारी व वाहतूकदार व चालक यांच्यात झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला आहे.
हा संप मागे घेतल्यामुळे लवकर इंधन वाहतूक सुरू होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. केंद्र अपघात कायद्याबाबत बैठकी गैरसमज काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. आणखी काही गैरसमज असेल तर काढू असेही बैठकीत ठरले.
या संपामुळे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर निघावे, यासाठी सातत्याने दोन दिवसांपासून बैठका सुरु होत्या. अखेर या हालचालींना यश आले आहे. मंगळवारी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी टँकर चालक, मालक यांची बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला आहे. मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून गरज पडल्यास बंदोबस्तात टँकर रवाना होणार आहे. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती ही माहिती दिली.