शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सातारा जिल्ह्यातील दंगलीचा मानवाधिकार संघटनेने फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट बनवून गृहमंत्र्यांना केला सुपूर्द, हे आहे आक्षेप

ऑक्टोबर 7, 2023 | 2:51 pm
in संमिश्र वार्ता
0
download 2023 10 07T145003.834

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा : सातारा दंगलीच्या घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन झाले असून त्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा १९९३ मधील तरतुदींनुसार योग्य भरपाई देण्यात यावी,अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषद संचालक विपिन मेनन यांनी राज्य शासनाकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे काही आक्षेपार्ह घटना घडल्या. यात हिंदू देवी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. एका मुस्लिम समुदायाच्या सदस्याचा दंगलीत मृत्यू झाला होता. पुसेसावळी गावातील मशिदीवर हल्ल्यात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. सदर घटनांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे सहा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने महाराष्ट्र हादरला होता.

पुसेसावळी गावातील आणि सातारा शहरातील घटनांचा संबंध नसला तरी या दोन्ही घटनांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक ठरले. कारण या दोन्ही गावातील घटनांतला एक समान धागा म्हणजे हिंदू देवदेवता, भारत माता आणि छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे.सोशल मीडिया मेसेजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाइल कोड ००९२ हा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानात नोंदणी केलेल्या मोबाईलवरून सातारा शहरातील हिंदूंना धमकीचे संदेश येत असल्याची बाब गंभीर आहे. यात समाजकंटकांचा सहभाग तर आहेच, पण सीमापार संपर्काचे गांभीर्यही लक्षात घ्यावे लागेल. भारतीय मानवाधिकार परिषद ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत परवानाकृत संस्था आहे. परिषदेची मुख्य उद्दिष्टे मानवाधिकार क्षेत्रात मदत करणे, प्रशिक्षण देणे, प्रोत्साहन देणे, संरक्षण करणे आणि हस्तक्षेप करणे असे आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.

पुसेसावळी व सातारा शहरातील रहिवाशांनी भारतीय मानवाधिकार परिषदेकडे याप्रकरणी लक्ष घालून वस्तुस्थितीच्या आधारे न्याय द्यावा असे आवाहन केले. त्यामुळे अशा परिस्थितीत अफवा आणि असंबद्ध आरोपांतून तथ्य शोधणे व त्या ठिकाणी घडलेल्या घटनांचे खरे चित्र देणे आवश्यक झाले. याशिवाय, हिंदू समाजाला अश्लील व अपशब्द आणि प्रक्षोभक टिप्पणींबद्दल संताप वाटत असतानाच पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे ते अस्वस्थ आहेत. हिंदू देवतां आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्या मूळे हिंदू समाज खूप दुखावला गेला आहे. या घटनांचा स्थानिक लोकांवर होणारा परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय मानवाधिकार परिषदेने या समस्येत हस्तक्षेप करण्याचे ठरवले. घडणाऱ्या घटनांची साखळी, घटनांचे मूळ आणि त्यामागील कारणे शोधण्यासाठी एक सत्य शोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावर सर्वसमावेशक सत्य शोध अहवाल सादर करून या घटनांचे निरनिराळे स्वरूप, पुसेसावळी व सातारा शहरात त्या काळात काय घडले. याचे खरे चित्र मांडण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली. त्यानुसार परिषदेच्या सत्य शोधन समितीने आपला अहवाल सादर केला आहे,असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला तालुक्यात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश, दुसरा मात्र गायब (बघा व्हिडिओ)

Next Post

अंबानींचा मोठा डाव… आबुधाबीतील ही दिग्गज कंपनी करणार रिलायन्स रिटेलमध्ये इतक्या कोटींची गुंतवणूक…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
images 74

अंबानींचा मोठा डाव… आबुधाबीतील ही दिग्गज कंपनी करणार रिलायन्स रिटेलमध्ये इतक्या कोटींची गुंतवणूक…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011