प्रशांत सुधाकर चौधरी, ज्योतिष शास्त्री
मेष- जेवणामध्ये पालक गाजर भोपळा काकडी मुळा यांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास लाभ होतो
वृषभ- निरोगी राहण्यासाठी फळे भाजीपाला लिंबू पाणी यांचे सेवन करावे तेलकट चमचमीत पचायला जड असे पदार्थ खाताना संयम पाळावा
मिथुन- रात्रीचे भोजन जरा कमी व हलके घ्यावे उत्तम झोप आरोग्यास चांगली नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात
कर्क– दारू व मास हे खाऊ नयेत दूध दही लिंबू सुकामेवा यांचे सेवन उत्तम
सिंह- चरबी युक्त पदार्थ खाणे टाळावे शाकाहारी भोजन फळे सुकामेवा उत्तम
कन्या – पचनसंस्थेचे आजार यांना जास्त असतात यांनी आहारामध्ये दूध फळे भाज्या व पचायला हलके असे अन्नपदार्थ घ्यावेत औषधाचे अति सेवन टाळावे
तूळ– अति गोड यांनी खाऊ नये अति तिखट अटी आंबट या पदार्थही यांनी टाळावे सात्विक आहार घ्यावा
वृश्चिक- मलविसर्जन प्रणाली यांची खराब असते यांनी पचायला हलके असे अन्न घ्यावे दूध फळे भाजीपाला यांचे सेवन करावे रक्त वृद्धीकारक पदार्थ अंजीर कांदा लसूण यांचा समावेश आहारात असावा पाणी जास्त प्यावे मास व दारू वर्ज करावी
धनु- यांना सायटिका संधिवात यांचा त्रास जास्त असतो यांनी एका जागेवर जास्त वेळ बसू नये तसेच चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे रात्री लवकर जेवून झोपावे शतपावली करून जर झोपले तर आरोग्य उत्तम राहते
मकर- गुडघ्याचे आजार यांना सतावतात पालक फळे काकडी हिरव्या भाज्या यांचे प्रमाण जास्त ठेवावे प्रसन्न वातावरणात राहावे हलका व्यायाम करावा
कुंभ- रक्त प्रवाह वृद्धीकारक पदार्थ यांनी सेवन करावे दूध दही पनीर सॅलड गाजर ही फळे जास्त असावी सकाळी मोकळ्या हवेत फिरणे आरोग्यवर्धक असेल
मीन –रोगप्रतिकारक शक्ती दुर्बळ असते हवामान बदलाचा त्रास यांना होतो जास्त आंबट गोड चरबीयुक्त अन्नपदार्थ यांनी टाळावे मादक पदार्थ अजिबात घेऊ नये पुरेशी विश्रांती व घरचे ताजे अन्न सेवन करावे
सर्व राशीच्या मंडळींनी जेवताना पाणी शक्यतो घेऊच नये जेवण झाल्यावर किमान अर्ध्या तास आधी व नंतर पाणी घेतल्यास उत्तम लाभ मिळतात