इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अजब गजब प्रेमकहाणी मध्ये राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यामधील एका गावात सासू जावयायाबरोबर फरार झाल्याची लव्ह स्टोरीची पुन्हा एकदा चर्चेतल आली आहे. त्याचेही कारण तसेच आहे. गेल्या वर्षाचा मागोवा घेतांना या लव्हस्टोरी पुन्हा रंगली.
गेल्या वर्षी सास-याला जावयाने दारु पाजून सासूबरोबर पलायन केले होते. जावयाच्या प्रेमात पडलेली सासू ४० वर्षांची तर जावई २७ वर्षांचा आहे. सासरवाडीला आल्यानंतर या दोघांमध्ये गप्पा रंगायच्या. या गप्पामधून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले व त्यातूनच पळण्याचा प्लॅन तयार झाला.
ठरलेल्या प्लॅननुसार जावई सासरवाडीला आला. त्याने सास-याला दारु पाजली व त्यानंतर तो सासुला घेऊन फरार झाला. सास-याला जेव्हा शुध्द आली तेव्हा त्याला आपली पत्नी जावयाबरोबर पळून गेल्याचे कळाले. या घटनेची बातमी गावातही वा-यासारखी पसली व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे या घटनेचा दोन्ही कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे.
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेजवळ सिरोही जिल्ह्यामधील गावातील सासु व जावयाची लव्ह स्टोरी सध्या पुन्हा चर्चेत आहे. कारण ही स्टोरी अजब गजब प्रेमकहाणीमध्ये अग्रेसर आहे.