नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक आयुक्तालयातील हद्दीत नववर्ष पूर्व संध्येला उपद्रव करणा-या इसमांविरुध्द पोलिसांनी ४४५ जणांवर कारवाई केली. या कारवाईत आडगांव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर असे परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात १५१ टवाळ खोर व ६३ रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अंबड, सातपुर, इंदिरानगर, उपनगर, नासिकरोड, देवळाली कॅम्प, एमआयडीसी चुचांळे असे परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १६३ टवाळखारे व ६८ रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा एकुण ४४५ इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३६ केसेस करण्यात आल्या असून १ लाख ९५ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात विना हेल्मेट, सिट बेल्ट, ट्रिपल सिट, सिंग्नल जंप, नो पार्किंग, ब्लॅक फिल्म अशा कारवाईचा समावेश आहे.
१३ पोलीस ठाणे हद्दीत ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट बंदोबस्त, ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईन्टचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ वाहने पेट्रोलिंग करीता अशी एकुण ६५ वाहने गस्ती करीता तैनात करण्यात आले होते. बंदोबस्त करीता तैनात करण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.