बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

३१ डिसेंबर पर्यंत ८.१८ कोटीपेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्र दाखल, गेल्या वर्षाच्या तुलनेत इतक्या टक्के वाढ

जानेवारी 1, 2024 | 11:01 pm
in राष्ट्रीय
0
Income

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 31.12.2022 पर्यंत दाखल 7.51 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांच्या तुलनेत मूल्यांकन वर्ष 2023-2024 मध्ये 31.12.2023 पर्यंत 8.18 कोटी विवरणपत्र दाखल झाल्याने प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करून घेण्यात वाढ नोंदवत नवा विक्रम केला आहे. मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये दाखल झालेल्या एकूण आयटीआर पेक्षा हे 9% जास्त आहे. या कालावधीत दाखल केलेल्या लेखापरीक्षण अहवाल आणि इतर फॉर्मची एकूण संख्या 1.60 कोटी आहे, मागील वर्षाच्या संबंधित कालावधीत 1.43 कोटी लेखापरीक्षण अहवाल आणि फॉर्म दाखल करण्यात आले होते.

मोठ्या संख्येने करदात्यांनी त्यांचे वार्षिक माहिती विवरण (एआयएस) आणि करदात्यांचा माहिती सारांश (टीआयएस) पाहून त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या डेटाची तुलना करून त्यांची विवरणपत्रे सादर केली आहेत. सर्व आयटीआर मध्ये डेटाचा एक महत्त्वपूर्ण भाग पगार, व्याज, लाभांश, वैयक्तिक माहिती, टीडीएस संबंधित माहितीसह कर भरणा, भरपाई न झालेला तोटा, मॅट क्रेडिट इत्यादींशी संबंधित डेटाने भरलेला होता. या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, परिणामी प्राप्तिकर विवरणपत्र सुरळीत आणि जलद दाखल झाली.

तसेच, या आर्थिक वर्ष 2023-2024 दरम्यान, ओएलटीएएस देयक प्रणाली बदलून डिजिटल ई-पे कर भरणा प्लॅटफॉर्म – टीआयएन 2.0 ई-फायलिंग पोर्टलवर पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आला. यामुळे करांच्या ई-पेमेंटसाठी इंटरनेट बँकिंग, एनईएफटी/आरटीजीएस, ओटीसी, डेबिट कार्ड, पेमेंट गेटवे आणि यूपीआय सारखे वापरकर्ता-अनुकूल पर्याय सक्षम झाले. टीआयएन 2.0 प्लॅटफॉर्मने करदात्यांना करभरणा वेळेवर करण्यास सक्षम केले आहे ज्यामुळे आयटीआर दाखल करणे सोपे आणि जलद झाले आहे.

करदात्यांना त्यांचे आयटीआर आणि फॉर्म लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, लक्ष्यित ई-मेल, एसएमएस आणि इतर सर्जनशील मोहिमांद्वारे 103.5 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले. अशा एकत्रित प्रयत्नांमुळे मूल्यांकन वर्ष 2023-24 च्या 31.12.2023 पर्यंत 9% अधिक आयटीआर दाखल होत फलदायी परिणाम मिळाले. ई-फायलिंग हेल्पडेस्क चमूने सर्वाधिक आयटीआर दाखल होण्याच्या कालावधीत करदात्यांना सक्रियपणे पाठिंबा देत 31.12.2023 पर्यंत वर्षभरात करदात्यांच्या अंदाजे 27.37 लाख प्रश्नांची हाताळणी केली. इनबाउंड कॉल्स, आउटबाउंड कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबएक्स आणि को-ब्राउझिंग सत्रांद्वारे करदात्यांना हेल्पडेस्ककडून सहाय्य प्रदान करण्यात आले. हेल्पडेस्क टीमने ऑनलाइन प्रतिसाद व्यवस्थापन (ओआरएम) द्वारे विभागाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर प्राप्त झालेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे करदाते/ भागधारकांपर्यंत पोहोचून आणि त्यांना जवळपास रिअल-टाइम आधारावर विविध समस्यांसाठी मदत करून पाठबळ दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताची अवकाश भरारी…मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील या महाविद्यालयाचा

Next Post

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला ४४५ टवाळखोर, मद्यपीवर कारवाई तर वाहतूक नियम मोडणा-यांकडून इतका दंड वसूल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20240101 WA0558 e1704131168348

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला ४४५ टवाळखोर, मद्यपीवर कारवाई तर वाहतूक नियम मोडणा-यांकडून इतका दंड वसूल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011