मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून बैठका आणि आढावा

by Gautam Sancheti
जानेवारी 1, 2024 | 10:49 pm
in राज्य
0
eknath shinde cm3


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या. यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना नववर्षांच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

सरकार सामान्यांच्या हितासाठी गतिमानपणे निर्णय घेतानाच त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमी आपल्या कृतीतून ते दाखवतात. आज त्यांचे मंत्रालयात आगमन झाले. यानंतर त्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्यातील सामान्य नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे. राज्य शासन घेत असलेल्या निर्णयांची अमंलबजावणी प्रशासनाकडून केली जाते ती अधिकाधिक प्रभावीपणे केली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मंत्रालयाकडे रवाना झाले. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचे आगमन झाल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याबाबत आढावा घेतला. नाशिक येथे १२ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचा देखील थोडक्यात आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या फायलींवर स्वाक्षरी करत नववर्षाचा प्रारंभ केला. सायंकाळी उशिरापर्यंत भेटीगाठी, नववर्ष शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरूच होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला

Next Post

भारताची अवकाश भरारी…मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील या महाविद्यालयाचा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
GCw63HVbAAAGJAM

भारताची अवकाश भरारी…मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील या महाविद्यालयाचा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011