येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात नायलॉन मांज्यामुळे एक सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मल्हार नितीन राऊत असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
मल्हार हा चांदगाव येथून आजोबांसोबत दुचाकीवरुन येत असतांना कटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकल्याने गळ्या पासून तोंडा पर्यंत त्याला खोल जखम झाली. त्यानंतर तातडीने त्याला येवला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येथे त्याच्यावर डॅाक्टांरांनी उपचार केले. नॅायलॅान मांजामुले जखम मोठी असल्याने तब्बल चाळीस टाके घालण्यात आले. नायलॉन मांज्यावर बंदी घातलेली असतांना त्याचा वापर होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.