चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रहार संघटनेतर्फे कांदा निर्यात बंदी विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करुन केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. टाळ, मृदंग, भजन गात शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा काढण्यात आले. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकारने निर्यात बंदी करुन कांदा उत्पादकांवर अन्याय केला असून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने त्या विरोधात शेतक-यां मध्ये तीव्र रोष आहे. त्यात प्रहार संघटनेने नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा निर्यात बंदी विरोधात कांदा उत्पादक शेतक-याची प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत असून त्यात वेगळेपण आहे. या आंदोलनामागे सरकारचे लक्ष वेधणे हे प्रमुख कारण आहे.