नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ वादातून जुने नाशिक परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा रविवारी विनयभंग करण्यात आला. किरकोळ याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिघटनेत दुकानासमोर बांधलेल्या पाय-यामुळे येण्याजाण्यास अडथळा होतो असे सांगण्यास गेलेल्या दांम्पत्यास वाहब रशीद पठाण (घर नं. १३०५) याने मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
दुस-या घटनेत भावाचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या महिलेचा रेहान अख्तार शेख (रा. घर नं. १२३५ त्र्यंबकनाका पोलिस चौकीजवळ) याने विनयभंग केला. संशयित रविवारी महिलेच्या भावाशी वाद घालत होता. यावेळी महिला त्यास समजून सांगण्यासाठी गेली असता संतप्त संशयिताने शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. दोन्ही घटनांबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.