इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजस्थान सरकार आजपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर साडेचारशे रुपये इतक्या अनुदानित दराने वितरीत करणार आहे. हे सिलेंडर मात्र सर्वांना मिळणार नाही तर ते फक्त उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. एक हजाराच्या सिलेंडरवर केंद्र सरकार ४०० रुपये अनुदान देते. त्यामुळे हे सिलेंडर ६०० रुपयांना मिळत होते. पण, आता राजस्थान सरकार १५० रुपये अनुदान देणार आहे. त्यामुळे हे सिलेंडर ४५० रुपयाला मिळणार आहे.
या अनुदानाचे पैसे थेट महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील, असे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास,सबका प्रयास या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरु केला असल्याचे मुख्यमंत्री शर्मायांनी सांगितले.
सध्या दारिद्र्यरेषेखालील आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दरानं अनुदानित एलपीजी सिलिंडर प्रदान केले जातात. प्रत्येककुटुंब वर्षाला १२ अनुदानित सिलिंडरसाठी पात्र असेल. राजस्थानमध्ये ७० लाख लोकांकडे या योजनेचे गॅस सिलेंडर आहे. त्यांना हा फायदा होणार आहे.