नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झारखंडमध्ये झालेल्या कारच्या अपघातात ६ मित्र ठार झाल्याची घटना घडलेली असतांना महाराष्ट्रमध्ये सुध्दा कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ही घटना मुंबई – आग्रा महामार्गावरील इगतपुरी बायबास जवळ बोरटेंभे येथे घडली. या अपघातात एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली व त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातामुळे मुंबई – नाशिक वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहाटे ही घटना घडली. सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई – नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोरटेंभे येथे भरधाव वेगातील मर्सिडीज कारने एमएच २ ईएक्स ६७७७ भाजीपाला घेऊन जाणा-या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर सुरुवातील स्थानिकांनी मदत केली. पण, तीन जण जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच रुट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी यांनी मदतकार्य केले. जखमींना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.