इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाराणसीच्या येथे IIT-BHU (Banaras Hindu University) मध्ये दोन महिन्यापूर्वी गँगरेप प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना १३ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे तीन्ही आरोपी भाजपचे असून पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत हकालपट्टी केली. कुणाल पांडेय ,सक्षम पटेल, आनंद उर्फ अभिषेक चौहान ही या आरोपींची नावे आहे. पण, या आरोपींना अटक करण्यासाठी तब्बल ६० दिवस लागले. हे सर्व आरोपी घटना घडल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीचा प्रचार करत होते. त्यानंतर ते उत्तर प्रदेशमध्ये आले.
भाजपच्या वरीष्ठांशी या सर्व आरोपींचा संबध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशा थाटात ते फिरत होते. पण, विरोधी पक्षाचा वाढता दबाब व विद्यार्थ्यांचे सुरु असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी या आरोपींना तब्बल ६० दिवसानंतर अटक केली. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर या आरोपींची ओळख पोलिसांनी ७ दिवसानंतरच कळाली होती. पण, वाराणसी पोलिस या आरोपींना पकडण्यासाठी घाबरत होते.
काल समाजवादी महिला सभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, नेहा यादव यांनी बीएचयूमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधात जीपीओ येथे निदर्शने करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. नेहा यादवने या घटनेबाबत सांगितले की, अलीकडेच बीएचयूच्या कॅम्पसमध्ये आयआयटीच्या विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. ज्यामध्ये हे अत्याचार करणाऱ्या आरोपी भाजप नेत्यांनी विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करता यावे म्हणून घटनेचा व्हिडिओही बनवला. अटक करण्यात आलेले आरोपी हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यामध्ये मुख्य आरोपी कुणाल पांडेची ओळख आयोजक भाजप आयटी सेल बनारस, सक्शम पटेल सह-संयोजक भाजप आयटी सेल बनारस आणि तिसरा आरोपी आनंद उर्फ अभिषेक चौहान हा भाजप आयटी सेलचा कार्यकारिणी सदस्य म्हणून ओळखला जातो.
या तिन्ही आरोपींचा यापूर्वीही विनयभंगासारख्या गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याचे नेहाने सांगितले. सत्तेच्या रक्षणाचा दबाव आणि त्यांच्या राजकीय मग्रुरीमुळे पोलिसांनी कारवाई करण्यात रस दाखवला नाही, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आणि अशी क्रूर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील मुलींमध्ये संतापाचे वातावरण आहे. मुली घर सोडायला घाबरतात. केंद्रीय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वच विद्यापीठांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेहा यादव यांनी बीएचयूमधील पीडित विद्यार्थिनीला सुरक्षितता आणि न्याय मिळावा आणि या घटनेशी संबंधित सरकारकडून संरक्षित लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या आरोपींचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यूपी, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री यूपी, मंत्री स्वतंत्रदेव सिंग, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्री आणि संघटनेचे बडे नेते यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचे या आरोपींच्या छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. पीडितेला न्याय मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.
पीडित विद्यार्थिनीला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी नेहाने केली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संरक्षण देणाऱ्या भाजप नेत्यांनाही आरोपी बनवून चार्टशीट दाखल करावी. बीएचयूमधील कॅम्पसमधील घटनेनंतर कॅम्पसमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी. केंद्रीय विद्यापीठांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय समिती आणि छेडछाड कक्षाची स्थापना करावी.