इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झारखंडच्या जमशेदपुर येथे सोमवारी सकाळी आदित्यपूर येथील सहा मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. बिष्टुपर पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्किट हाऊस एरिया जवळ हा अपघात झाला. डिवायडरला कारने धडक देऊन नंतर झाडावर ती आदळली. त्यानंतर ही कार पलटी झाली. या अपघातात सहा तरुण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की लांब राहणा-या लोकांना सुध्दा त्याचा आवाज आला.
या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाचा एमजीएममध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन तरुणांना टीएमएच आणि स्टील सिटी येथे दाखल करण्यात आले आहे. या कारमध्ये ८ तरुण होते. त्यातील दोन वाचले.
एकीकडे लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत, तर दुसरीकडे जमशेदपूरकरांसाठी नवीन वर्षाची सुरुवात वेदनादायी ठरली. ही घटना साई मंदिर चौकाजवळ घडली, इंडिगो कारमधून आठ तरुण मरिन ड्राइव्हकडे जात होते. दरम्यान, हा अपघात झाला. यात कारमधील आठही तरुण हे पिकनिकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.