नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन -निमा या नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य अशा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ३१ डिसेंबर रोजी खेळीमेळीत व उत्साहात संपन्न झाले. दोन अडीच वर्षाच्या प्रशासकीय कारकीर्दी नंतर या वर्षी निमा या संस्थेवर सहधर्मदाय आयुक्तांनी २१ सदस्यांची जानेवारी २०२३ मध्ये नियुक्ती केली होती. त्यानुसार या २१ सदस्यांनी निमाचे अध्यक्ष म्हणून धनंजय बेळे यांची निवड केली. आणि अध्यक्षांनी पुढे निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व विविध समित्यांची निवड केली. या कार्यकारिणीने संपूर्ण वर्षभरात धनंजय बेळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जोमाने काम करत विविध उपक्रम व प्रदर्शने, सेमिनार, फंड रेसिंग प्रोग्राम्स व अशा अनेक कार्यक्रमानंद्वारे निमाची गंगाजळी वाढवत असतानाच उद्योजकांच्या हिताचे व त्यांना मदतीसाठीचे अनेकविध महत्त्वाचे उपक्रम राबवले.
३१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या निमाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुरुवातीला दिवंगत सभासद नातेवाईक व इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सर्व सभासदांचे स्वागत केले त्यानंतर सचिव राजेंद्र अहिरे यांना अजेंड्याप्रमाणे कामकाज करण्यास सुरुवात केली . त्याप्रमाणे अजेंडातील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले.
त्याचप्रमाणे या सर्वसाधारण सभेमध्ये सहधर्मदाय आयुक्तांनी मान्यता दिलेल्या घटनेप्रमाणे पुढील वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड सभासदांमधून करण्यात आली. सभेमध्ये उपस्थित सर्व सभासदांनी हात वर करून नवीन कार्यकारणी सदस्यांची एकमताने निवड केली.
या नियुक्तीची घटनेप्रमाणे नोंद घेवून अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला व सत्कार करण्यात आले.
विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी मागील वर्षातील केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्या बद्दल माहिती दिली. तसेच मागील वर्षात आयमा, नाईस, महाराष्ट्र चेंबर, लघुउद्योग भारती,अशा सर्व संघटनांनी व तसेच शासकीय अधिकारी, उद्योजक,सभासद यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच मागील कार्यकारिणीने दिलेल्या योगदानाबद्दल देखील त्यांनी आभार मानले.
महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेच्या, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल निमाचे माजी अध्यक्ष व नाईस चे चेअरमन रमेश वैश्य या सर्वांनी आपले विचार मांडताना निमाने मागील वर्षी केलेल्या कार्याबद्दल निमा टीमचे कौतुक केले. नव नियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी निमा उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, हर्षद ब्राह्मणकर,सतीश कोठारी,मनीष रावल,जितेंद्र आहेर, संजय सोनवणे, किशोर इंगळे,ललित बुब,योगिता आहेर, एन टी गाजरे,एस के नायर, विजय कदवाने,सुरेंद्र मिश्रा, हेमंत खोंड,दिलीप वाघ,देवेंद्र राणे,रवी श्यामदासांनी, कैलास सोनवणे,किरण वाजे,गोविंद झा,विजय जोशी, सुधीर बडगुजर, उमेश कोठावदे,प्रकाश ब्राह्मणकर,सुनील जाधव, अखिल राठी, शैलेश नारखेडे,राजेंद्र कोठावदे, अप्पासाहेब जाधव,विलास लिदुरे,देवेंद्र विभुते,राजेंद्र पानसरे,संजय महाजन,अजय यादव,कैलास यादव, सिद्धेश रायकर,रवींद्र झोपे, भरत येवला, सचिन तेजाळे, प्रसन्न जाधव,प्रवीण वाबळे,किरण पाटील, अशोक ब्राह्मणकर ,अविनाश मराठे,नानासाहेब देवरे,एस बी गांगुर्डे,के टी पाटील,किरण मते, यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते, श्री विरल टक्कर यांनी ऑडिट रिपोर्ट व आर्थिक लेखाजोखा मांडला तर श्री राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली.