नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील तिसगांव येथे प्रथमच ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज तिसगाव चांदवड तालुका ओबीसी, भटके, विमुक्त आरक्षण बचावतर्फे विशाल कँडल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे व समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ योगेश गोसावी, जिल्हा अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे,भुजबळ समर्थक अंबादास भाऊ खैरे,समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई आहेर,समता परिषद नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथआण्णा आहेर,ओबीसी जेष्ठ नेते सुनील कबाडे,ज्येष्ठ पदाधिकारी नंदुभाऊ मंडलिक,संत शिरोमणी सावता माळी महाराज देवस्थान मंदिर ट्रस्टचे सहसचिव हभप नवनाथ महाराज गांगुर्डे,अखंड भुजबळ समर्थक सुनील पैठणकर येवला, यु.के.आहेरसर,डॉ.अरुण निकम,किशोर शेलार,कट्टर भुजबळ समर्थक संदीपआप्पा गांगुर्डे,भालचंद्र भुजबळ,युवा नेते भुषण गांगुर्डे,जेष्ठ नेते शांताराम गांगुर्डे,टी पी निकम आदी पदाधिकारी सामील झाले होते.
यावेळी सर्व जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मशाल ज्योत पेटवून कँडल मार्चचा प्रारंभ करण्यात आला. नंतर तिसगांव येथील सर्व युवा वर्गाच्या हस्ते प्रमुख पाहुणे दिलीप आण्णा खैरे यांचा महात्मा फुले यांची फुले पगडी देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. समस्त चांदवड तालुक्यातील लहान मुले मुली महिला पुरुष यांची उपस्थिती या मोर्चात होती. संपूर्ण गावात कँडल मार्च करत ओबीसी बांधवांची घोषणांनी प्रभातफेरी काढली.