नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरत्या वर्षात अर्थातच २०२३ मध्ये लाच लुचपत प्रतिबंध विभागा नाशिक परिक्षेत्राकडुन एकुण १६१ सापळा कारवाई करण्यात आले असन एकुण २३५ लाच घेणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक घटकात ६२, अहमदनगर घटकात ३४, धुळे घटकात १८, नंदुरबार घटकात १५ व जळगाव घटकात ३२ सापळा कारवाई करण्यात आलेल्या असुन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संपर्ण कारवाईत २३५ आलोसेंमध्ये नाशिक परिक्षेत्रात वर्ग १ चे १४, वर्ग २ चे २५, वर्ग ३ चे १२६, वर्ग ४ चे १४, इतर लोकसेवक १७ व खाजगी इसम ३९ यांचा समावेश असल्याची माहिती एसबीने दिली आहे.
संपुर्ण २०२३ मध्ये नाशिक परिक्षेत्रात विविध विभांगावर कारवाई करण्यात आलेली असून वर्षभरात महसुल विभागात ३५ कारवाई, पोलीस विभागात ३०, जिल्हा परिषद १५ कारवाई, म.रा. वि. वि कपंनी मर्या विभागात १०, सहकार विभागात ८, पंचायत समिती ७, व भुमी अभिलेख ७ अशा विविध विभागांत कारवाई केली आहे.
वर्षभरात महत्वाचे अधोरेखित व महत्वाचे सापळा कारवाई नाशिक घटकाने भुमी अभिलेख विभागातील जिल्हा अधिक्षक महेश शिंदे व लिपीकावर ५००००/- रू लाच स्विकाल्याची कारवाई, सिन्नरचे सहायक निबंधक रणजित पाटील व लिपीक विरनारायण यांना २००००००/- रू लाच स्विकारतांना पकडण्यात आले. सहकार खात्यातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे जिल्हा निबंधक सतीष खरे यांना ३०,००,०००/- रू लाच स्विकारतांना पकरण्यात आले, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांचेवरील कारवाई, तसेच शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी व प्रशासनधिकारी सुनिता धनगर यांना ५५०००/- रू स्विकारतांना पकडण्यात येवुन त्यांचेवर कारवाई करण्यात आली, दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांचे वर ४००००००/- रू लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली. नाशिकचे तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांना घराचे पार्कीगमध्ये १५०००००/- रू लाच स्किारतांना पकडण्यात येवुन कारवाई करण्यात आली. राज्य वस्तु व सेवा कर अधिकारी जगदीश पाटील यांचे वर कारवाई केली.
नगर घटकातील वैदयकीय अधिकारी डॉ. वैशाली सुर्यवंशी, कोपरगाव तहसिलदार विजय बोरूडे यांचेवर कारवाई तसेच विशेष लेखा परिक्षक किसन सागर, यांना १०००००/- स्विकारतांना पकडण्यात आले. नंदुरबार घटकात महेश पाटील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यांनी ४३०००००/- रू लाचेची मागणी करून त्यांना त्यापैकी ३,५०,०००/- रू घेतांना पकडण्यात आले होते.
धुळे विभागत म.रा.वि.वि मर्या कंपनीचे व्यवस्थापक अमर खोंडे व उप व्यवस्थापक मनोज पगारे यांना २०००००/- रू स्विकारतांना पकडण्यात आले. जळगाव विभागात पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस नाईक तुषार पाटील यांचे वर ५०००००/- य मागणी करून ३०००००/- स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
जळगाव जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर विसपुते यांचेवर ४०००००/- लाचेची रक्कम स्विकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. सहा गटविकास अधिकारी रविंद्र सपकाळे व विस्तार अधिकारी पदमाकर आहीरे यांना ५०००००/- रू लाचेची रक्कम स्विकारतांना पकण्यात आले आहे.
२०२३ मध्ये नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वात मोठी कारवाई नाशिक घटकतील पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत व त्यांचे टीमने नगर घटकात महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ विभागातील सहा अभियंता अमित गायकवाड व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांचे केली असुन अमित गायकवाड यांना १ कोटी रू लाचेची रक्कम स्विकरतांना पकडण्यात आलेली आहे. तसेच या संपूर्ण वर्षात एकुण २,१५,०९,३६० रू लाच स्विकारण्याचे सापळा कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिक्षण विभागातील सुनिता धनगर यांचेवर कारवाई केले नंतर तपासात उघड चौकशी करून त्यांचेवर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नगर घटकात १ अन्यभ्रष्टाचाराचा गुन्हा व नाशिक घटकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे वर अन्य भ्रष्टाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यावर्षात नाशिक परिक्षेत्र १६१ सापळा कारवाई करून महाराष्ट्रातील एकुण सापळा कारवाईत पहिल्या स्थानी आहे. नाशिक परिक्षेत्रात या वर्षी ०५ केसेस न्यायालयात शाबीत झाले असुन त्यामध्ये नाशिक घटकात २, नगर घटकात २ व नंदुरबार घटकात २ या प्रमाणे शाबीत निकाल लागले आहेत. यामध्ये राजु पुणा रामोळे, शाखाधिकारी, लघुपाटबंधारे उप विभाग, सटाणा, जि. नाशिक. यांचे वरील सन २०१९ मधील लाच मागणी कारवाई न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व १००००००/- रू दंड ठोठावला आहे.
सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.