नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युक्रेनने बेल्गोरोद या रशियन शहरावर केलेल्या हल्ल्यात २१ जण ठार तर ११० जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश आहे.
किवमधून रॉकेटला क्लस्टर बाँब लावून ते प्रक्षेपित केले गेले. त्यामुले हा हल्ला म्हणजे गुन्हा आहे असा आरोप रशियानं केला आहे. रशियानं काल युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केल्यानंतर युक्रेननं हा हल्ला केला.
दरम्यान रशियानं युक्रेनवरचे हल्ले तीव्र केले आहेत. रशियानं किव शहरात ड्रोन हल्ले तर खारकिवमध्ये निवासी भागांचं नुकसान केले आहे.