सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ६० फुटी रस्त्यावरील डेली भाजीपाला गुजरीतील व्यापारी संकुलास शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झालीत. यात दोन दुकान बंद असल्याने आगीच्या झळांमध्ये या दुकानांचे मोठे नुकसान झाले.
६० फुटी रोडवरील डेली भाजीपाला गुजरीत माजी नगरसेवीका सुमनबाई दगाजी सोनवणे यांच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे तत्वावर दिलेले आहेत. यात टेलरींग, सलून व फोटो फ्रेम मेकर अशा तीन दुकाने शेजारी शेजारी आहेत. यातील एका दुकानाला शॅार्टसर्कीटमुळे आकस्मित आग लागली. आगीने पेट घेतल्यामुळे दुकान चालक बाहेर आला. आगीच्या झळा इतर दोघ दुकानांना बसल्यात.
अग्निशमन दलाला दुरध्वनीवरून आगीची माहिती कळविण्यात आली मात्र आगीचा भडका अधिक असल्यामुळे परीसरातील तरुण व नागरीकांनी जवळपास असलेले पाणी उपलब्ध करून आग विझवण्याचा व दुकानात असलेले सामान वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला.अग्निशामक बंब उशीरा दाखल होऊन आग विझवली. तीघ दुकांनामध्ये असलेले साहित्य फर्नीचर जळून खाक झाले. यामुळे दुकान चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.