नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, जळगाव व डीएआरसीने निर्णायक विजय मिळवले.
एसएसके क्रिकेट मैदानावर जळगाव विरुद्ध विजय क्लब सामन्यात जळगावने विजय क्लबवर १३६ धावांनी विजय मिळवला. जळगावतर्फे फलंदाजीत तनय प्रसाद ५० व कर्णधार आर्यन पाटील ३४ तर विजयतर्फे हर्ष पाश्ते ४७ धावा यांनी , तर गोलंदाजीत विजयच्या मोहित बाफनाने डावात ५ तर जळगावच्या आर्यन पाटील ४ व पवन दुबेने ३ बळी घेत चमक दाखविली .
दुसऱ्या सामन्यात एम सी सी क्रिकेट मैदानावर डी ए आर सी ने मध्य विभागावर एक डाव व ७६ धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजीत डी ए आर सीच्या रणवीर चव्हाणने ११२, स्वराज पिंगळेने ६२ व कृष्णा डोकेने ५४ धावा केल्या तर गोलंदाजीत डी ए आर सी च्या कर्णधार अर्जुन पवार ने डावात ६ तर अर्णव मधे व देवाशिष गायकवाडने प्रत्येकी ३ बळी घेत चमक दाखविली . मध्य विभागाच्या ध्रुव पुंड व रुद्राक्ष जाधव यांनी हि प्रत्येकी ३ बळी घेतले.