जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीमेत ही कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या या मोहिमेत पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर-बोद वड रस्त्यावर अवैधपणे ताडी(मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील ४०० लिटर तयार ताडी व आरोपी मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध दारु वाहतूक करणा-या प्रकरणाचा पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.