गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई आग्रा महामार्गावर १८ लाख ३२ हजारचा अवैध मद्यसाठा जप्त….नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

by India Darpan
डिसेंबर 30, 2023 | 3:21 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20231230 WA0248 1 e1703929869407

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल परिसरात १८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा व कंटेनर असा एकुण ३८ लाख ३२ हजार ९६४ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकांची कारवाई सुरु आहे. २८ डिसेंबर रोजी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा कंटेनर पकडण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, काही इसम एका बंद कंटेनर मध्ये विदेशी मद्याचा साठा भरून अवैधरित्या मुंबई आग्रा महामार्गाने जात असल्याची माहीती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी १० वा मैल परिसरात सापळा रचून नाशिक बाजूकडे जाणारा कंटेनर क्रं NL-01-N-7630 थांबविला. सदर कंटेनरची झडती घेतली असता त्यात रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर १, ट्यूबर्ग बिअर असे पंजाब राज्य उत्पादन असलेले विदेशी मद्याचे एकूण ५७१ बॉक्स असा एकूण १८ लाख ३२ हजार ९६४ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला.

सदरचे विदेशी मद्य पंजाब राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये विक्री करण्यास मनाई असून देखील यातील इसम हे बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बिल तयार करून, शासनाचा महसूल चुकवून, शासनाची फसवणूक करून अवैधरित्या विदेशी मद्यसाठा कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या वाहतूक करताना मिळून आल्याने कंटेनर मालक मोहन कनाराम लाल, रा दांतीवास, जिल्हा जालोर, राजस्थान व कंटेनर वरील पळून गेलेला चालक व त्याचे इतर साथीदार यांचे विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात विदेशी मद्याचा एकुण १८ लाख ३२ हजार रुपये चा अवैध मद्यसाठा व कंटेनर असा एकुण ३८ लाख ३२ हजार ९६४ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील., सपोनि सागर कोते, सपोनि गणेश शिंदे., पोउपनिरीक्षक दत्ता कांभीरे, पो उपनिरीक्षक नाना शिरोळे, ASI शिवाजी ठोंबरे, पोहवा नवनाथ सानप, शांताराम घुगे, सतीश जगताप, मनोज सानप यांचे पथकाने कामगिरी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावीच्या विद्यार्थ्यासह शाळेच्या सहलीदरम्यान काढलेले ते फोटो मुख्याध्यापिकाच्या अंगलट….

Next Post

अनुसूचित जाती घटकाशी निगडित प्रश्नाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.हे निर्देश

India Darpan

Next Post
10 1 1140x570 1 e1703930548533

अनुसूचित जाती घटकाशी निगडित प्रश्नाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011