इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पलथा यांना दहावीच्या विद्यार्थ्याबरोबर रोमँटिक फोटोशूट केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. एका शैक्षणिक सहलीदरम्यान हे फोटो काढण्यात आले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले व त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर काढलेले हे फोटो तसे संतापजनक आहे. यात मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकांनी सुध्दा शिक्षणाधिका-याकडे मुख्याध्यापिकाची तक्रार केली आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकेच्या हे फोटोशूट अंगलट आले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेनंतर अमित सिंग राजावत यांनी सोशल मीडियावर फोटो टाकत एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. खरं तर विद्यार्थ्यांबरोबर कसे वागावे व त्यांच्याबरोबर किती मर्यादा पाळाव्या हे मुख्याध्यापिकाने इतर शिक्षकांना सांगणे अपेक्षित आहे. पण, मर्यादा सोडून असे कृत्य त्यांनीच केल्यामुळे या फोटोची चर्चा तर होणारच…..