इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. त्यात राज्यात महायुती व महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्यामुळे यातील घटक पक्ष किती जागा लढणार यावर नेहमी चर्चा होते. दरम्यान महायुतीच्या एका फार्मूलाची आता जोरदार चर्चा सुरु असून त्यात कोणत्या पक्षाला किती जागा याबद्दल बोलले जात आहे.
या चर्चेत भाजप २४ तर शिंदे गटाला १४ व अजित पवार गट १० जागा मिळणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. यात अजित पवार गट अधिकच्या जागेसाठी आग्रही आहे. याअगोदर देवेंद्र फडणवीस यांनी फार्मूला सांगतांना भाजप २६ व २२ जागा या शिंदे व अजित पवार गटाला सोडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी अजून जागा वाटप बाबत काही निशचित नसल्याचे सांगितले होते. या जागा वाटपात विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची परंपरा असली तरी त्यांच्या एकुण कामाबाबत त्यावर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी खासदारांची धगधग वाढली आहे.
देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात घवघवीत यश मिळवल्यामुळे भाजप आता दबावतंत्राचा वापर करणार आहे. त्यामुळे जागा वाटपात भाजप सांगेल तेच घडणार असल्याचे चित्र आहे. चर्चा सुरु असलेल्या फार्मूलामध्ये शिंदे गट व अजित पवार गट यांना २४ जागा मिळणार आहे. त्यात वाटाघाटी झाल्यात तर थोडाफार फरक पडेल असे बोलले जात आहे.