इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
ओ मोठ्ठया ताई … सांगत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले राजकीय करिअरची उठाठेव करण्यापेक्षा आपल्याला बारामतीकर पुन्हा दिल्लीत पाठवतात की नाही याची जास्त चिंता तुम्हाला असायला हवी…
मतदारसंघातल्या जनतेची चिंता वाहिली नाही तर संसदेपासून सडकेवर येण्याचा आपला प्रवास अटळ आहे..राहता राहिली गोष्ट देवेंद्रजींच्या अखत्यारीतल्या गृह खात्याची…जेव्हापासून या खात्यामागे महाविकास आघाडीने लावलेलं वसुलीचं देशमुखी ग्रहण सुटलंय, तेव्हापासून ते देवेंद्रजींच्या नेतृत्वात अगदी तडफेने काम करतंय..
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुमच्या नेत्यांकडून पोलीस ठाण्यात फोन जायचे कारण कोयते नाचवणारे तुमचाच जयजयकार करणारे असायचे..आताचं देवेंद्रजींचं गृह खातं या कोयतेवाल्यांचा काळ बनून राहिलंय..आम्ही कोयतेवाल्यांनाही सोडत नसतो आणि या कोयतेवाल्यांवर पक्षाची झूल पांघरून वरदहस्त ठेवणाऱ्या मास्टरमाईंड्सना पण… असे सांगत टीका केली आहे.
…