सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक – वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास कारखान्यात शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीतील भट्टीचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते. आगीने रुद्र रूप धारण केल्याने यावेळी आगीचे लोळ सर्व दूर पसरल्याने सर्व माळेगाव एमआयडीसी मध्ये धूर पसरला होता आग विझवण्यासाठी सिन्नर नगरपरिषद अग्निशामक दलाचे जवानांनी व माळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले पण आग आटोक्यात येत नसल्याने व पाण्याचेही टंचाई भासत असल्याने नाशिक वरून अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचा अंदाज असून घटनास्थळी सर्वत्र काळ्या धुराचे साम्राज्य पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यावेळी माळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले आग कशामुळे लागली हे रात्री उशिरापर्यंत समजले नाही यामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी झाली का नाही याबाबत रात्री उशिरापर्यंत काही ठोस माहिती मिळू शकली नाही आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे अथक च परिश्रम सुरू होते.