बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतात या गंभीर कर्करोगावर आता मौखिक डोस….

डिसेंबर 29, 2023 | 9:08 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
WhatsAppImage2023 12 29at6.07.34PM9IDW e1703864307638

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नवी मुंबईतील, कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र, (ACTREC) यांनी बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स सोबत, सहकार्य करत, देशात, मर्कॅप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस, 6 – मर्कॅप्टोप्यूरिन (6-एमपी) विकसित केले आहे. 6-एमपी हे रक्तपेशींच्या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगात, जो साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, त्यात किमोथेरपीचे औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे, लहान मुलांना सहजपणे घेता येईल, असं हे भुकटीस्वरूपातील मौखिक औषध, प्रीव्हल (PREVALL) या नावाने बाजारात आले आहे.

प्रीव्हल, सहजपणे १० मिलि ग्राम/मिलि लीटरचा डोजपासून १०० मिलीचे मौखिक औषध तयार केले जाऊ शकते. प्रीव्हल सोबत एक सिरिंज आणि एक प्रेस इन बॉटल अडॅप्टर (पी. आय. बी. ए.) असते, यामुळे रुग्णाच्या शरीराच्या वजनाच्या किंवा शरीराच्या आकारमानानुसार अचूक डोस देणे शक्य होते. यामुळे सायटोटॉक्सिक संयुगांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील यामुळे कमी होऊ शकतो.

प्रीव्हल विकसित होण्यामुळे, संशोधकांनी, कर्करोग उपचार प्रवासातला एक मैलाचा दगड गाठला आहे. करण सध्या या औषधाच्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र, त्यामुळे, अचूक मात्रा, लवचिकता, रुग्णाची सहन करण्याची क्षमता, अशी सगळी आव्हाने असतात.आतापर्यंत, मुलांमधील मात्रेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळी कुटून त्याची भुकटी देणे किंवा एक दिवसाआड डोस देणे अशा पद्धती अवलंबल्या जात होत्या.

नियामक मान्यता : प्रीव्हलला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता मिळाली आहे. या नियामक मंजुरीत, प्रीव्हलची सुरक्षितता आणि अनुपालनावर भर देण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आणि रुग्ण दोघांनाही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल. टाटा मेमोरियल सेंटर आणि आय. डी. आर. एस. लॅब्सने संयुक्तपणे क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. अलीकडेच पीडियाट्रिक ब्लड अँड कॅन्सर या वैज्ञानिक नियतकालिकात या निष्कर्षांना नियामक मान्यता मिळाली आहे.

बाजारातील उपलब्धता : 6-मरकॅप्टोप्युरिनचे ड्राय पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असलेले फार्मास्युटिकल सस्पेंशन हे आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट नोंदवलेले तंत्रज्ञान आहे. आयडीआरएस लॅब्सने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे PHOCON परिषदेत PREVALL या कर्करोगावरील औषधाचे अधिकृत अनावरण केले. हे औषध डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आणि लवकरच ते देशभरातील सर्व प्रमुख रुग्णालयाच्या औषधालयात उपलब्ध असेल. ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया (ALL) या कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झालेल्या १-१० वयोगटातील अंदाजे १०,००० मुलांना दरवर्षी PREVALL चा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया सारख्या सर्व बऱ्या करता येण्याजोग्या कर्करोगाचे निदान झालेल्या मुलांची सर्वोत्तम संभाव्य काळजी घेतली जावी, आणि औषधाच्या मात्रेचे सर्वोत्तमीकरण करणे, औषध घेण्याच्या नियमांचे पालन सुधारण्यासाठी आणि औषधांचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यात PREVALL सारखी औषधे मदत करतील, असे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. गिरीश चिन्नास्वामी, यांनी सांगितले.

PREVALL हे भारतीय परिस्थितीसाठी सर्वात अनुकूल अशी औषधे तयार करणाऱ्या भारतीय बायोफार्माच्या अंतर्निहित सामर्थ्याचे आणि गहनतेचे प्रकटीकरण आहे, असे निरिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार, संशोधन, आणि शिक्षण संस्थेतील (ACTREC) क्लिनिकल फार्माकोलॉजी या विषयाचे प्राध्यापक डॉ. विक्रम यांनी नोंदवले. “ओरल सस्पेन्शनसाठी (तोंडावाटे दिले जाणारे औषध) वापरली जाणारी पावडरची परिणामकारकता उष्ण किंवा दमट हवामानात देखील कायम राहील याप्रकारे ही पावडर तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ही पावडर जगात इतरत्र उपलब्ध असलेल्या द्रवरूप औषधांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे,” असेही त्यांनी सांगितले.

PREVALL ने बालरोग हिमॅटो-ऑन्कोलॉजीमधील (रक्तपेशींचा कर्करोग) वैद्यकीय उपचारांमध्ये पोकळी भरून काढली आहे, अशी टिप्पणी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरसधील शैक्षणिक विभागाचे संचालक तसेच जेष्ठ पेडियाट्रिक हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बाणावली यांनी केली. 6-मर्कॅपटोप्युरिनचे द्रवरूप औषध युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. अशी माहिती त्यांनी दिली. भारत आणि इतर विकसनशील देशांमधील मुलांना विकसित देशांमध्ये कर्करोगाचा मानक उपचार म्हणून वापरली जाणारी औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई येथील टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी उत्तम सहयोगी प्रयत्नांची प्रशंसा केली आणि नवीन औषधे आणि फॉर्म्युलेशन उपलब्धता सुधारण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यात अशा अधिक सहकार्याची गरज आहे यावर भर दिला. CAR-T या पेशी आधारित उपचार पद्धतीचे उदाहरण देऊन टाटा मेमोरियल सेंटर नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरने अलीकडेच अशा सहकार्याच्या माध्यमातून या उपचार पद्धतीचा पाया घातला आहे, असेही ते म्हणाले.

हा विकास आरोग्यसेवेतील गरज आणि नवोन्मेष यातील अंतर भरून काढण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगाच्या हितसंबंधांच्या एककेंद्राभिमुखतेचे फलित आहे, असे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी सांगितले.समाजाच्या कल्याणासाठी नवोन्मेष प्रयोगशाळेतून प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड तालुक्यातील सरपंच व उपसरपंच ३० हजाराची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात

Next Post

एचएएलमध्ये या नवीन सुविधेचे बेंगळुरूमध्ये संरक्षण सचिवांनी केले उद्‌घाटन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
hal

एचएएलमध्ये या नवीन सुविधेचे बेंगळुरूमध्ये संरक्षण सचिवांनी केले उद्‌घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011