नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे ८ गायी व ६ वासरूची सुटका करुन त्यांना पोलिसांनी पांजरपोळ येथे पाठवले. २ लाख ९० हजार रुपये किंमतीची ही गोवंश जातीची जनावरे भद्रकाली पोलिस स्टेशनच्या शोध पथकाने शोधून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. भद्रकाली पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील घर नं. ३५७३ च्या समोर पत्राचे शेड मध्ये भोई गल्ली मागे, मिरादातार दर्गाजवळ अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे आणले असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकासह जावून पडताळणी केली. यावेळी या ठिकाणी ७ गायी व ४ वासरू अशी ११ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत २ लाख ५० हजार रुपये किंमतीची जनावरे मिळुन आली. ही कारवाई सुरू असतांना पोलीस स्टेशन हद्दीत घर नं. २९४२ कुरेशी गल्ली, तेजाळे चौक भद्रकाली येथे देखील अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे आणले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी १ गायी व २ वासरू असे ३ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत ४० हजार रुपये किंमतीची जनावरे मिळुन आलेली आहेत.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण ८ गायी व ६ वासरू असे १४ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत २ लाख ९० हजार रुपये किंमतीची जनावरे मिळुन आली असून सदर जनावरे ही पुढील पालनपोषण करीता पांजरपोळ नाशिक येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.