नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता सेवा प्रदाते (VDA SPs) अर्थात डिजिटल माध्यमातून मालमत्ता सेवा पुरवठादार कंपन्यांना मार्च 2023 मध्ये, मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएल)-2002 च्या तरतुदींअंतर्गत, अँटी मनी लाँडरिंग/काउंटर फायनान्सिंग ऑफ टेररिझम (AML-CFT) चौकटीमध्ये आणण्यात आले आहे.
या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ऑफशोअर अर्थात देशाबाहेरील संस्थांविरुद्ध अनुपालन कारवाईचा एक भाग म्हणून, फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट इंडिया (FIU IND) अर्थात भारतीय आर्थिक गुप्तचर संस्थेने, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा-2002 च्या कलम 13 अंतर्गत, नऊ ऑफशोअर व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट सर्व्हिस प्रोव्हायडर (VDA SPs) ना,अर्थात डिजिटल माध्यमातून मालमत्ता सेवा पुरवठादार असलेल्या देशाबाहेरील नऊ कंपन्यांना अनुपालनाबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
FIU IND च्या संचालकांनी,भारतातील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचे पालन न करता बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या या कंपन्यांच्या URL ब्लॉक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.