नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाने प्राप्तीकर कायदा,१९६१ (‘कायदा’) मधील कलम १९४-ओ नुसार ई-वाणिज्य परिचालकाच्या डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा अथवा मंचाच्या माध्यमातून झालेली वस्तूंची विक्री किंवा दिलेली सेवा अथवा दोन्हीतून मिळालेल्या एकूण उत्पन्नावर त्या परिचालकाने एक टक्का दराने प्राप्तीकर वजा करावा अशी तरतूद आहे.
सीबीडीटीच्या दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी जारी अधिकृत परिपत्रक क्र.20/2023 नुसार कलम 194-ओ मधील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठी खुले नेटवर्क (ओएनडीसी) यांसारख्या बहुविध ई-वाणिज्य परिचालक मॉडेल नेटवर्कसंदर्भात सदर कलमाच्या व्यवहार्यतेशी संबंधित विविध मुद्द्यांबाबत स्पष्टता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
या परिपत्रकामध्ये विविध प्रकारच्या परिस्थितीची तपशीलवार उदाहरणे देण्यात आली असून हे पत्रक विविध मुद्द्यांबाबत स्पष्टता देते. विविध विभागांकडून मिळालेल्या सूचनांनुसार, सीबीडीटी परिपत्रकात विविध मुद्द्यांवरील एफएक्यूज म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.