इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१५ ऑक्टोंबरपासून सुरु होणा-या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवरसप्तश्रृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाची दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर ही धडक तपासणी मोहिम सुरु राहणार असल्याचे एफडीएने सांगितले आहे. वणीच्या सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते व त्याठिकाणी लोक प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद इत्यादींची खरेदी करतात. त्याठिकाणी भाविकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून प्रशासनामार्फत आज रोजी सप्तश्रृंगी गडावर तपासणी मोहिम राबविण्यात येवून त्याअंतर्गत पेढा विक्री केंद्राच्या खालीलप्रमाणे तपासण्या करण्यात केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
त्याचप्रमाणे या दहा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे सांगितले. १) अक्षय रामचंद्र बाटे यांचे आई भगवती पेढा सेंटर २) कुंडलिक ईश्वर शिंगटे यांचे भगवती पैठा सेंटर ३) रणजित नागनाथ सायकर यांचे आई साहेब पेढा सेंटर ४) हनुमंत परसु यादर यांचे पेढा विक्री केंद्र ५) केशव श्रीरंग खुणे यांचे आराध्या पेढा सेंटर ६) गोरख दादा हरी साळुंके यांचे भगवती प्रसाद पैदा सेंटर ७) संदीप शशीकांत बेनके यांचे पेठा विक्री केंद्र ८) विठ्ठल रावसाहेब शिंदे यांचे जय माँ सप्तश्रृंगी पेढा सेंटर ९) संदीप नारायण अडगळे यांचे भगवती पैदा सेंटर १०) प्रल्हाद नामदेव गव्हाणे यांचे मयुरी प्रसाद पेढा सेंटर, या १० विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली असून सदर ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. परंतू त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतिम टिकण्याची क्षमता (best before ) याबाबतचे टँग प्रदर्शित केले नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झालेले आढळून आले.
वरील सर्व पैदा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सह आयुक्त संजय नारगुडे व सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रशासनातर्फे भाविकांनी आवाहन करण्यात येते की, पेढे, प्रसाद खरेदी करतांना स्वच्छता असलेल्या ठिकाणाहून तसेच निटनेटके झाकून ठेवलेल्या ठिकाणाहून खरेदी करावे. शिळे अन्नपदार्थ खरेदी करु नयेत. खात्रीलायक ठिकाणांवरुनच पेढा तसेच मिठाईची खरेदी करावी.