मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट सहकार आयुक्तांनी कारवाई केली आहे.
याअगोदर त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळानी वेगळा गट स्थापन करुन त्यांना धक्का दिला. त्यानंतर ही कारवाई समोर आली आहे. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांच्याकडून पात्रता निकषात बसत नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गुणरत्न सदारवर्ते यांचे पॅनल बँकेवर निवडून आल्यानंतर तीन ते चार महिन्यात एसटी बँकत मोठ्या घडमोडी घडल्या. बँकेतील ४८० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढण्यात आल्या. त्यानंतर एसटी बँकेच्या संचालक मंडळानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सहकार खाते सक्रीय झाले असून त्यांनी सौरभ पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली.