गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला मोटर सायकल समोर कार आडवी टाकून १ लाख ६८ हजार रुपये लुटणारे आरोपी गजाआड

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 4:57 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20231228 WA0256 1 e1703762829940

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा दिवसापूर्वी वडनेर पाथर्डी रोडवर साई ग्रँड लॉन्स समोर चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चार जणांनी मोटार सायकलस्वाराकडून उधारीची रक्कम असलेली बॅक लंपास करत कोयत्याने डोक्यात वार करून एकाला जखमी केल्याची घटना होती. या बॅगेतील रोख रक्कम १ लाख ६८ हजार रुपये या चारही जणांनी लंपास केले होते. या आरोपींना उपनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडे चोरी केलेल्या रक्कमेपैकी १ लाख ४० हजार रुपये व गुन्हयात वापरलेली हयुंडई २० कार एम एच १२ जीबी ६७०४ हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणात चंद्रकांत विजय काकडे, वय-२३, रा. काकडे गल्ली, रोकडोबावाडी, नाशिकरोड, नाशिक, शाहबाज शफि शेख, वय-२१, रा. मदिना नगर, रोकडोबावाडी, नाशिकोड, नाशिक, सोनु छबु गवळी, वय-२०, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड यांना अटक केली आहे.

या घटनेबाबत सविस्त माहिती अशी की, १८ डिसेबर रोजी रात्री १०:१५ वा. प्रकाश बन्सी मरसाळे हा नेहमी प्रमाणे त्यांचे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटार सायकल वरून वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव कडे येत असताना साई ग्रँड लॉन्स समोर, वडनेर पाथर्डी रोड याठिकाणी एका पांढ-या चारचाकी वाहनामध्ये चार इसमानी येऊन प्रकाशच्या मोटार सायकलला कट मारून त्याला थांबवले. तसेच चारचाकी वाहनाच्या खाली उतरून प्रकाश याच्याकडून उधारीची रक्कम असलेली बॅक ओढण्याचा प्रयत्न केला. प्रकाशने बॅग देण्यास विरोध गेला असता आरोपीने त्यांच्या कडील कोयत्याने प्रकाशचे डोक्यात वार करून त्याला जखमी केले. सदर बॅगेतील रोख रक्कम १,६८,००० रू. सह बॅग बळजबीने हिसकावून घेतली.

या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शननानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग आंनदा वाघ यांनी उपनगर पोलीस ठाणे पोलीस पथकास आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. तसेच उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकास रवाना केले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व पोलीस निरीक्षक / गुन्हे बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार दोन पथकांनी तपास सुरु केला..
सदर गुन्हे शोध पथकाचे गुप्त बातमीदार यांच्या मदतीने रोकडोबावाडी परीसरातील दोन संशयित इसम फरार असल्याची माहिती मिळवली. सदर बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तेच आरोपी असल्याची खात्री झाल्याने आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवून त्यांना शिताफिने पकडले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE: नागपूरला सुरु असलेली काँग्रेसची है तैयार हम सभा बघा लाईव्ह

Next Post

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011