इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कतार मध्ये अटकेत असलेले ८ नौदलाचे माजी अधिकारी यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयावर भारत सरकारने आक्षेप घेतला होता. त्यानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे. पण, त्यांचा तुरुंगवास कायम राहणार आहे. याबद्दलचा संपूर्ण निकाल अद्याप हाती आलेला नाही.
गेल्या वर्षी या माजी अधिका-यांना अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे सर्व माजी अधिकारी एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांच्यावर इस्त्राइलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने याबाबत सांगितले की, कतारच्या अपील न्यायालयाचा दाहरा ग्लोबल खटल्यातील निकाल लक्षात घेतला आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. सविस्तर निकालाची प्रतीक्षा आहे.
या सुनावणीच्या वेळी कतारमधील भारताचे राजदूत आणि इतर अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यही हजर होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच भारत सरकार त्यांच्या पाठीशी उभे होते. त्यांनासर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत करत दिली जात आहे. भारत सरकार हे प्रकरण कतारी अधिकार्यांकडेही पुढे चालू ठेवणार आहे.