इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी आज भेट घेतली. आतापर्यंत या वर्षातील ही पाचवी भेट असल्यामुळे राजकीय चर्चेला सुध्दा उधान आले आहे. याअगोदर २७ मार्च, त्यानतंर २० एप्रिल, ७ जुलै,२ व आता २८ डिसेंबर या तारखेला ते मुख्यमंत्र्यांना भेटले. वरवर ही भेट वेगेवेगळ्या कामाच्या व प्रश्नावर असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीमागे नेमकं दडलं काय ही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
उध्वव ठाकरे यांना थेट आव्हान निर्माण करणा-या एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटण्यामागे काहीतरी राजकारण शिजतंय अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे आतापर्यंत इतर मुख्यमंत्र्यांना याअगोदर इतक्या वेळ भेटले नाही. त्यामुळे या चर्चा होत आहे. या भेटीत मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, राममंदिर, मुंबईतील विकास कामे यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
याअगोदर २ डिसेंबरला राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळेस राज ठाकरे म्हणाले होते की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे मंत्री दादाजी भुसे ह्यांच्यासोबत माझ्या घरी ‘शिवतीर्था’वर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत ‘नागरिकांकडून होणारी अमाप टोलवसुली, टोलनाक्यांमधून होणाऱ्या रहदारीचं सर्वेक्षण ह्या संबंधीची माहिती आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहचवू’ असं मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, त्या टोलविषयीची माहिती तसंच ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठी पाट्यांचा आदेश आणि कायदा पायदळी तुडविणाऱ्यांना वेळीच कडक शासन करावं’ ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
त्यावेळेस राज ठाकरे यांच्याबरोबर आमदार जू पाटील हेही उपस्थित होते, त्यांनीही आपल्या मतदारसंघातील आणि महानगरातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते. आजच्या भेटीत राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे नेते बाळ नांदगावकर हे होते.