इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याची चर्चा सुरु असतांना काल शरद पवार यांनी या विषयावर माध्यमांशी बोलतांना त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आज वंचित आघाडीने पत्र प्रसिध्द करत पवारांचे कौतुक केले.
या पत्रात म्हटले आहे की, शरद पवार यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या विधानाची माहिती मिळाली, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचित बहुजन आघाडीच्या पत्राला उत्तर देण्याची आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी (MVA) आणि इंडिया आघाडीचे निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी दिल्लीत केली होती.
१९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या चौथ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो. अद्याप आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) दिल्लीतील मुख्यालय किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयाकडून कोणतेही पत्र किंवा कॉल किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद प्राप्त झालेला नाही. तथापि, आम्ही सकारात्मक आहोत आणि महाविकास आघआडी आणि इंडिया आघाडी या दोन्हीमध्ये आमंत्रित करण्यासाठी काँग्रेसकडून प्रतिसादाची वाट पाहत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे यांनी हे प्रसिध्द पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.