इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शेतीचे कामे आवरुन घ्या, सण, उत्सव, लग्न समारंभ बाजूला ठेवा आणि मराठा आरक्षणासाठी तुमच्या पुढील पिढीसाठी आंदोलनात सहभाग व्हा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पदयात्रेचा मार्गही सांगितला. शनिवारी २० जानेवारीला सकाळी ९ वाजता आंतरवलीतून मुंबईकडे पायी मोर्चा निघणार आहे.
या मोर्चाचा मार्ग सांगताना ते म्हणाले की, आंतरवली सराटी अहमदनगर वाशी मार्गे मुंबईत पायी दिंडी प्रवेश करणार आहे. आंतरवलीतून निघालेला पायी मोर्चा थेट मुंबईत धडकणार आहे. शनिवारी मराठा मोर्चा आंतरवलीतून निघाल्यानंतर तो मार्गावरील विविध गावातून जाणार आहे. ज्या मार्गाने मोर्चा जाणार आहे. त्या गावांना मोर्चेकरांना सहकार्य करा असे आवाहन सुध्दा त्यांनी केले.
यावेळी त्यांनी राज्यात ५४ लाख मराठा नोंदी सापडल्याचेही सांगितले. ही संख्या कमी नाही. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा ठाम निर्धार मनोज पाटील यांनी व्यक्त केला. एकदा बाहरे पडलो तर आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असे त्यांनी सांगितले.
या आंदोलना सामील होणा-यांनी वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याचप्रमाणे गावातील
भजन मंडळ, टाळकरी, हलगी पथक, शिवशाहीर, जागरण गोंधळ करणारे, भरुडकार यांनी मनोबल वाढविण्यासाठी यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.