इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमधील गुना जिल्हयात बुधवारी रात्री बस व डंपरमध्ये अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात बस पलटी झाली त्यानंतर तीला आग लागली. यामध्ये १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १४ प्रवाशी जखमी झाले. रात्री नऊ वाजता हा अपघात झाला.
गुना – आरोन महामार्गावर ही दुर्दैवी घटना घढली. डंपरने महामार्गावर प्रवाशी बसला जोरदार धक्का दिला. डंपरच्या या जोरदार धडकेमुळे बस पलटी झाली. त्यानंतर तीला भीषण आग लागली. त्यात १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही बस गुनाहून आरोनला जात होती.
ही घटना घडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॅा. मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात अकाली मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. या भीषण परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. भविष्यात असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी जखमी प्रवाशांवर योग्य ते उपचार व्हावेत तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. बाबा महाकाल मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत. .