इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सेक्सला नकार दिला म्हणून उत्तर प्रदेशच्या सिध्दार्थ नगर जिल्हयातील खोडरे येथे मांत्रिकाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या मांत्रिकाने महिलेचा मृतदेह जाळून तो झाडीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बुधवारी आरोपी मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. खोडरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.
ही महिला मुलीसोबत राहत होती तर तीचा नवरा हा शहराबाहेर कामाला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ती आजारी होती. उपचाराचा तीला फायदा होत नव्हता. त्यामुळे गावातली एकाने तीला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती मांत्रिक भगवानदिनला भेटली. त्यावेळेस तीन तीचे आजारपण सांगितले.
या भेटीतून मग मांत्रिक व महिलेची ओळख वाढत गेली. त्यानंतर मांत्रिकाने विशेष संस्काराच्या बहाण्याने या महिलेला २९ सप्टेंबर रोजी घरी बोलावले व त्यानंतर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याला महिलेने नकार देताच त्याने रागात तीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जाळून तो झाडीत टाकला. या प्रकरणाचा पोलीसांनी कसून चौकशी सुरु केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. बुधवारी या महिलेचा खून केल्याच्या आरोपाखाली गोंडा पोलिसांनी ५० वर्षीय स्वयंघोषित मांत्रिकाला अटक केली. या घटनेची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. १ ऑक्टोबर रोजी ३५ वर्षीय महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता.