मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2023 | 11:48 pm
in स्थानिक बातम्या
0
unnamed 2023 12 27T234653.639

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. वर्षानुवर्ष सामान्य धुळेकर पिण्याच्या पाण्यासाठी आठ, दहा दिवस वाट बघत होतो. ज्या धुळे शहराची पिण्याच्या पाण्याच्या दुरावस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती, तो ठपका मिटविण्याचा हा क्षण सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा असा दिवस आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा मला विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अक्कलपाडा येथे केले.

बुधवारी अक्कलपाडा येथील प्रकल्पातून १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. धरण उद्भव योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी श्री.महाजन बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकात सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शाश्वत स्वरुपात मार्गी लागावा यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत होते. धुळेकरांना एकदिवसाआड पाणी देण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे त्रस्त धुळेकरांना आम्ही दिलासा दिला आहे. तसेच धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण करणार असून अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराचा विकास करायचा असेल तर मुबलक पाण्याशिवाय पर्याय नाही. धुळे शहरात यापूर्वी आठ दिवस, त्यानंतर चार दिवसांनी पाणी मिळत होते.अशा गंभीर स्थितीत धुळेकरांना झालेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. धुळे जिल्ह्यात ज्यावेळी 2018 मध्ये महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आलो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहराची कायमस्वरुपी तहान भागविण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. त्यानंतर योजनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला. सततच्या पाठपुराव्यामुळे योजनेचा दीडशे कोटीचा आराखडा मंजूर होऊन योजनेचे टेंडर निघाले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळेकरांना मुबलक पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या अमृत योजनेत हा प्रकल्प समाविष्ट करून घेतला. त्यानुसार आम्ही सातत्याने पाठपुरावा करत केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेले, अखेर ही योजना पूर्णत्वास आली असून, आता दोन दिवसाआड पाणी मिळते आहे, याचे आम्हाला अधिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

ही योजना पुर्णत्वास येण्यासाठी सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच प्रकल्पासाठी सहयोग करणारे अक्कलपाडा व परिसरातील शेतकऱ्यांनीही पाईप लाईन टाकण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळेच ही 170 कोटींची योजना पूर्णत्वास आली. अक्कलपाडा प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादन, तसेच अक्कलपाडा येथील धरणात 100 टक्के पाणीसाठा कसा साठविता येईल तसेच कॅनॉलद्वारे शेतीला पाणी मिळण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येईल. धुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुलवाडे-जामफळ योजनाही खान्देशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना असून यासाठी एक दोन महिन्यात ई -टेंडर काढणार असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पुर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळेकरांना रोज आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्याचा २०१९ मध्ये दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि याचा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे. २०१९ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. सद्यःस्थितीत या अक्कलपाडा प्रकल्पात केवळ ६० टक्केच जलसाठा होत आहे. तो १०० टक्के व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. अक्कलपाडा येथील प्रकल्पाचा जलसाठा वाढविल्यास प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच प्रकल्पाच्या डावा, उजव्या पाटचाऱ्यांचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे. जेणेकरून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळेल यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. अनेर धरण व इतर प्रश्नाबाबत बैठक घेऊन पालकमंत्री म्हणून आपण यात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार जयकुमार रावल म्हणाले की गेल्या ४० वर्षांपासून पिण्यासाठी ज्या अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत होतो ते पाणी आज धुळेकरांच्या घरात पोहोचले आहे. यामुळे हा सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे धुळ्याला आले होते त्यावेळी त्यांनी काही योजनांचे भूमिपूजन केले होते. त्यात मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले होते. या रेल्वे मार्गासाठी वर्षानुवर्षे मागणी झाली होती. या कामास आता प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. अक्कलपाडा योजना पूर्णत्वास आली असून, सुलवाडे-जामफळ योजनेचा प्रश्न होता. दरम्यानच्या काळात खंड पडला नसता तर आज या योजनेचेही लोकार्पण करता आले असते. मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून अनेक कामे झाली. धुळे जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात १२०० कोटी खर्चाची कामे झाली आहेत. भविष्यात पाण्याचे मीटर लावून कोणाला किती पाणी मिळते तेही पाहिले जाईल आणि एक दिवसाआड पाणी पुरविण्याचे नियोजन होईल, असे श्री.रावल यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी, विजय चौधरी, अनुप अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोदी आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनाधिक स्वरुपात घरकुलांची चावी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी,आभार प्रदर्शन हिरामण गवळी, तर सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर व वाहिदअली यांनी केले. कार्यक्रमास मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संरक्षण मंत्र्यांनी दिली जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागाला दिली भेट..हे आहे कारण

Next Post

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार सुरक्षागृह उभारणार…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ladki bahin yojana e1727116118586
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी होणार…

ऑगस्ट 26, 2025
WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250130 WA0334 4
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

ऑगस्ट 26, 2025
rpf
स्थानिक बातम्या

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

ऑगस्ट 26, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, २६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0362 e1756133644221
संमिश्र वार्ता

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओची अचानक भेट…चार कर्मचारी अनधिकृत गैरहजर, कारणे दाखवा नोटीस

ऑगस्ट 25, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत ट्रान्सनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटच्या प्रमुखाला केली अटक

ऑगस्ट 25, 2025
Next Post
vivah 11

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार सुरक्षागृह उभारणार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011