मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे – २६ डिसेंबर २०२३ पर्यंत, १२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे.
त्यानंतर पुरवणी याद्यांची छपाई – १ जानेवारी २०२४, १७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे – ५ जानेवारी २०२४, २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.