रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

३७ लाख किंमत असलेला ३७८ किलो गांजा व इनोव्हा कार जप्त….नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगिरी

डिसेंबर 27, 2023 | 7:59 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20231227 WA0297 1 e1703687383789


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७ लाख ८३ हजार २५० रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला. सदर कारवाईत इनोव्हासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा ६२ लाख ९० हक २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई सुरू आहे. सोमवार मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून, नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा ( एम.एच.२०.सी.यु.७०७०) थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. सदर वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला, परंतु ते मिळून आले नाही. पोलीसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला असता, नाशिक शहरातील आर.टी.ओ. ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले.

सदर वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७ लाख ८३ हजार २५० रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला. सदर कारवाईत इनोव्हासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा ६२ लाख ९० हक २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगणमत करून सदर वाहनामध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ ३७८ किलो ३२५ ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली तसेच सदरचे वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेले म्हणून त्यांचेविरूध्द सायखेडा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८, (क) २० (ब) खंड २ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींचा विशेष पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून, गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि गणेश शिंदे हे करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक . संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांताराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, चापोना जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी पावणेतीन लाख रुपयांचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

Next Post

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा सुधारित कार्यक्रम केला जाहीर.. आता या तारखेला होईल अंतिम यादी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Election logo nivdnuk aayog e1702627232547

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा सुधारित कार्यक्रम केला जाहीर.. आता या तारखेला होईल अंतिम यादी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011