नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण आणि दिंडोरी विभागाच्या भरारी पथकांनी कोशिंबे-कोकणगाव रोडवर संयुक्त कारवाई करीत सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा बनावट देशी दारूचा साठा जप्त केला आहे.
कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण व दिंडोरी विभागाच्या भरारी पथकांनी सोमवारी (दि. २५) दिंडोरी तालुक्यात कोशिंबे-कोकणगाव रोडवर रात्रीच्या गस्तीदरम्यान कोशिंबे गावठाणाच्या मोकळ्या जागेत कारवाई केली.
या कारवाईत देशी दारू प्रिन्स पथकाला मिळाले १० बॉक्स, एक कार, एक मोबाइल.संत्रा नावाचे लेबल चिटकविलेल्या काचेच्या बाटल्या मिळून आल्या. या बाटल्यांची भरारी पथकाने पाहणी केली असता, त्या बाटल्यांमध्ये बनावट देशी मद्य असल्याचे निदर्शनास आल्याने वाहनचालक व त्याचा साथीदार बनावट देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी वाहनासह बनावट दारू साठा जप्त केला, तसेच वाहनासोबत असलेला वाहनचालक संशयित अमित किशोर निकम यालाही पथकाने अटक केली. दरम्यान, मद्यसाठा घेणारा व पुरवठादार, तसेच जप्त वाहनमालक यांच्यासह अन्य संशयितांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.