गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यात ५२ गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड… वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2023 | 6:04 pm
in स्थानिक बातम्या
0
jail11

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर व‌ हातभट्टी गुंडांच्या पोलीस विभागाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. गुन्हे दाखल या ५२ गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढविला असून, जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान तब्बल ५२ जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई केली आहे.

जानेवारी २०२३ या महिन्यात अमळनेर २, भुसावळ व‌ चाळीसगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी- २३ मध्ये जळगाव मधील एकावर कारवाई करण्यात आली आहे . मार्च – २३ मध्ये जळगाव मधील २ जणांवर , अमळनेर व भुसावळमधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २३ महिन्यात चाळीसगाव, रावेर, जळगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मे २०२३ या महिन्यात चोपडा, जळगाव व अमळनेर मधील प्रत्येकी एका व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जून २०२३ महिन्यात जळगाव मधील ३ जण, भुसावळ व यावल मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जूलै २०२३ या महिन्यात भुसावळ मधील ३, अमळनेर, चाळीसगाव व जळगाव मधील प्रत्येक एक अशा ६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

ऑगस्ट २०२३ या महिन्यात जळगाव मधील ३, भुसावळ २, अमळनेर व चोपडा मधील प्रत्येक एक अशा ७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबर २०२३ या महिन्यात जळगाव मधील ६ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. ऑक्टोंबर २०२३ या महिन्यात जळगाव मधील २, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर मधील प्रत्येक एक अशा ५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये एरंडोल मधील एका वाळू तस्कारांवर कारवाई करण्यात आली. डिसेंबर २०२३ या महिन्यात आतापर्यंत भडगाव, यावल, जळगाव व एरंडोल मधील एका जणांविरुद्ध अशा एकूण ४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. एक गुन्हा उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर सदर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत असते. जिल्ह्यात एमपीडीए दाखल गुन्हेगारांना नाशिक, औरंगाबाद, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर व मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आलेले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे.

५२ जणांवर ५१३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे
एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या या ५२ जणांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ दाखल आहेत‌. यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, जातीय दंगली व विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या ३७ धोकादायक गुन्हेगारांवर ३७१ गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ४ जणांवर २९ गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या ११ जणांवर ११४ गुन्हे दाखल आहेत.

काय आहे एमपीडीए कायदा ?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तींविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. कारवाईनंतर गुन्हेगाराला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉलीमध्ये वारंवार बिघाड…भाविकांचा संताप

Next Post

अ‍ॅनिमल चित्रपटातील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्यावर या लहान मुलीचा बघा भन्नाट डान्स (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20231227 175848 X

अ‍ॅनिमल चित्रपटातील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्यावर या लहान मुलीचा बघा भन्नाट डान्स (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 6

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा…

ऑगस्ट 7, 2025
modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011