नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –यावर्षी पावसानं सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हयातील भूजल पातळी २.१३ मीटरपर्यंत घटली असल्यामुळे चिंताही वाढली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा १८५ विहिरींच्या सर्वेक्षणानंतर अहवाल समोर आला आहे. त्यात दिंडोरी तालुक्यात किमान ०.५ तर चांदवड तालुक्यात २.१३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळाचा निर्देशांक वाढला. भूजल पातळी घटल्याने जिल्ह्यावरील पाणीसंकट अधिक तीव्र होणार आहे. डिसेंबरपासूनच विहिरी आणि बोअरवेलमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीटंचाईमुळे दुष्काळाची तीव्रता वाढण्याची चिन्हं असल्यामुळे प्रशासनाही कामाला लागले आहे.
कोणत्या तालुक्यात भूजल पातळी किती घटली
तालुका – भूजल पातळीत घट
नाशिक – ०.२८ मीटर
बागलाण – १.११ मीटर
चांदवड – २.१३ मीटर
मालेगाव – १.२४ मीटर
निफाड– १.२८ मीटर
कळवण – १.२० मीटर
येवला – ०.७० मीटर
सिन्नर – ०.४६ मीटर
सुरगाणा – ०.३६ मीटर