नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नाशिककरांना होणार आहे. त्यांचा हा दौरा जानेवारी महिन्यात असल्याचे निश्चित झाले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी ते नाशिकला येणार आहे.
१२ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. त्यासाठी १२ जानेवारीला मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे.
या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील साडे सात हजार युवक युवती सहभागी होणार आहे. पंतप्रधांनचा दौरा असल्यामुळे प्रशासनाने सुध्दा तयारीला सुरुवात केली आहे.