नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर वाडीव-हे फाट्यावर दोन मोटर सायकल अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता हा अपघात झाला. या अपघातात भगवान गंगाराम धोंडे (२५) रा. खोडाळा, जि ठाणे, धीरज धनराज शर्मा (२६) संदेश क्षानेश्वर कोकणे (२९) रा.इगतपुरी हे तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक कडून मुंबईकडे जाणारी बुलेट मोटर सायकल स्लिप झाली व पुढच्या मोटर सायकलला मागून तीने जोरदार धडक दिली. या अपघात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ नाशिक येथ शासकीय जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले.