गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमळनेर येथे होणा-या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत यांनी दिला ३ कोटी ८० लाखांचा निधी…

by Gautam Sancheti
डिसेंबर 27, 2023 | 12:05 am
in राज्य
0
IMG 20231216 WA0220 3

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पार‌ पडणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाकडून २ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी ४० लाखांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास बाब म्हणून नगरोत्थान योजनेतून संमेलनाच्या अनुषंगाने १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडून २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे संमेलनाच्या विविध कामांसाठी ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यानुसार संमेलनास जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी २२ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये अमळनेर साहित्य समेलनासाठी २ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा तयारीचा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरोत्थान या योजनेतून पुनर्नियोजनात साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खास बाब म्हणून अमळनेर शहरांतील मधील अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी मंजूर केलेल्या ४० लाखांच्या निधीतून प्रताप महाविद्यालय संमेलनस्थळी जाणाऱ्या रस्त्याची उभारणीसह दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. एमपीएलएडीएस (संसद‌‌ सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना) अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी साहित्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मधील अंतर्गत रस्त्यांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. साहित्य संमेलन कामकाजाचा ते वेळोवेळी स्थानिक पातळीवर आढावा घेत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी २५ डिसेंबर रोजी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत संमेलन आयोजनाचा अमळनेर येथे आढावा घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आज, २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संमेलनस्थळी भेट देऊन पूर्वतयारीची माहिती घेतली. आयोजकांसोबत चर्चा केली. अमळनेर साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. खासबाब म्हणून आमदार निधी प्राप्त करून घेण्यासाठी ही जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाळीसगावला कॅफेत अश्लील चाळे….भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली तोडफोड (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकलचा अपघात… तीन जण गंभीर जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20231226 WA0395 e1703616461425

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकलचा अपघात… तीन जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

Untitled 6

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा…

ऑगस्ट 7, 2025
modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011