इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावर या भेटीचा फोटीही पोस्ट केला.
पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर बहुतांश मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाची भेट घेतली. यात भाजपसह विरोधी पक्षाचे मुख्यमंत्र्याचा समावेश होता.
राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये समन्वय असावा. त्याचप्रमाणे आपल्या राज्याला निधी मिळावा यासाठी ही भेट असते. यात पक्षीय राजकारण बाजूला सारुन मुख्यमंत्री भेट घेतात. यावेळी राज्याचे प्रश्नही पंतप्रधानापुढे मांडले जातात.