नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुस्लिम युवती राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी जातांना काल नाशिकला काही वेळ थांबली. त्यानंतर ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतांना मुस्लिम युवतीने सुध्दा अयोध्या जाण्याचा ठरवले व ती पायी निघाली.
या सोहळ्यासाठी ही मुस्लिम युवती आपल्या दोन मित्रांसह मुंबईहून पायी अयोध्येला निघाली. आज त्यांच्या यात्रेचा सहावा दिवस आहे. शबनम शेख अस या मुस्लिम युवतीचे नाव असून रमनराज शर्मा आणि बिनित पांडे असे तिच्या दोन मित्रांचे नाव आहे.
लहानपणापासून रामायणबाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आस्था असून अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा असल्याने ही मुस्लिम युवती पायी अयोध्या वारीला निघाली.